सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील न्यू इंग्लिश स्कूल, खणदाळ प्रशालेत मराठी गौरव दिन व कवी कुसुमाग्रज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण रामलिंग हिरेमठ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
मराठी भाषेच्या गौरवासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. कुमारी श्रिया राजेंद्र दळवाई हिने प्रभावी वक्तृत्व सादर केले. तिने कुसुमाग्रज यांच्या साहित्य कार्याचा आढावा घेतला. कुमारी रुक्सार मुल्ला हिनेही ओजस्वी भाषण केले. तिने मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमानिमित्त मराठी साहित्यिक व त्यांच्या साहित्यावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर सादर केली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी विषयाचे शिक्षक अण्णासाहेब पांडुरंग सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांनी मराठी राजभाषा गौरव दिनाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास शिक्षक निलेश पाटील, विजया सूर्यवंशी उपस्थित होते. धर्मगोंडा पाटील, धोंडीबा जाधव यांचीही उपस्थिती होती. आप्पासो कोणूरी व आकाश गोईलकर यांनी सहभाग नोंदविला.सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता सुदर्शन पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. मराठी भाषेचा अभिमान जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
