Top News

सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोघांची शोध मोहीम अद्यापही सुरू

 


अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :

अकिवाट - बस्तवाड मार्गावर मोटर चालू करण्यासाठी आणि शेतीचे कामासाठी जात असलेला ट्रॅक्टर उलटल्याची घटना सकाळी घडली. या घटनेत सहाजण बचावले होते यातील एक जण अत्याव्यवस्थ परिस्थितीत असल्याने त्यांना उपचारासाठी पुढे नेण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान येथील सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार व अण्णासाहेब हासुरे हे दोघेजण अद्यापही बेपत्ता असून त्यांची शोध मोहीम एनडीआरएफ जवानांच्या माध्यमातून सुरू आहे.

शुक्रवारी सकाळी ९ - १० वाजण्याच्या सुमारास अकिवाट गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मोटर चालू करण्यासाठी सरपंच यांचे पती सुहास पाटील, सहा जण माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार, अण्णासाहेब हासुरे यांच्यासह आठजण ट्रॅक्टरचे माध्यमातून प्रवाहाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली प्रवाहाच्या दिशेने जात असताना अचानक यावेळी सर्वांनी पाण्यात उडी मारली व आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी लगत असलेल्या कोळी बांधवांनी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून सहा जणांना पाण्याच्या बाहेर काढले. व उर्वरित दोघेजण कोणत्याही बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे. बचावलेल्या सहा जणांपैकी सुहास पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने