![]() |
| Ai फोटो |
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड परिसरात अचानक हवामानात मोठा बदल होऊन वादळी वाऱ्यासह गारपीट पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वादळाच्या तडाख्यामुळे दत्तवाड- घोसरवाड रस्त्यावर मोठे झाडे उन्मळून पडल्यामुळे रस्ता काही काळासाठी बंद झाले. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
या अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गारपीट व जोरदार वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान होण्याचे बोलले जात आहे. फळबागा आणि भाजीपाला पिकांना विशेष फटका बसल्याची शक्यता आहे.
