Top News

गौरवाडसह परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट

संग्रहित

अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क : 

शिरोळ तालुक्यातील गौरवाडसह औरवाड,आलास,बुबनाळ, कवठेगुलंद,शेडशाळ,गणेशवाडी परिसरात गुरुवारी रात्री साडेआठनतंर जोरदार वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला.  वादळी वार्‍याचा वेग इतका होता की,अनेकांच्या घरादारा-खिडकीतुन वारे आडवे तिडवे मारल्याने घरातील प्रांपचिक साहित्यासह स्वंयपाक घरातील भांडी इतस्तःत विखुरली गेली. धडकी भरवणारा वादळी वारा पाहुन घरातील आबालवृद्धामध्ये काहीवेळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते.यातच वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे सर्वांचीच भबेरी उडाली.सुमारे पंधरा वीस मिनिटे जोरदार वादळी वार्‍याचा मारा झाला.काही वेळाने वादळी वारे थांबल्यानतंर गाराचा पाऊस सुरु झाला.रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता.मात्र रात्रीचे दहा वाजुन गेले तरी वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.




थोडे नवीन जरा जुने