Top News

उर्दू शाळा कनवाडच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत दमदार कामगिरी

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

कनवाड येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध, अंकुर व गुरुकुल (GTS) स्पर्धा परीक्षा 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेच्या जोरावर ही कामगिरी साध्य केली.

या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठबळाच्या जोरावर हे यश मिळवले असल्याचे सांगण्यात आले.

इयत्ता पहिली मधील मुनिरा इनामदार, हुजेफा पटेल, इरम इनामदार , इकरा सनदी, फिजा इनामदार, आबिद धारवाडे, अरफा संदलवाले तर इयत्ता दुसरी मधील बेनजीर धारवाडे, शिफान मुल्ला, अलिषा इनामदार, रौनक मुजावर, अरसलान पटेल, उबेद पटेल, झिशान मुल्ला, कयूम शेख, अर्षद मुजावर, इयत्ता तिसरी मधील नईम शेख, इसरा इनामदार, आलिया इनामदार, जुवेरिया संदलवाले, इयत्ता चौथी मधील बरीरा मुजावर, महम्मदसाद इनामदार, मुनतहा पटेल, राबिया मुल्ला, आयत इनामदार, फैजान मुल्ला, इयत्ता सहावी मधील खतिजा बारगीर, निकहत मुजावर, इयत्ता सातवी मधील निफा जमादार, हुमेरा पाटील, सारा इनामदार या विद्यार्थी विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे.

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपली क्षमता सिद्ध केल्याचे या यशातून दिसून येते. या यशाबद्दल ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना उर्दु शाळेचे अध्यक्ष मुस्तफा बारगीर, सद्दाम बारगीर, सदस्य मेहबुब इनामदार, ताहीर इम्तियाज पटेल, हिना मुजावर, ताजनबी सनदी, हानिका पट्टेकरी, यांच्यासह मुख्याध्यापक जाहेदा मुल्ला, नियाज पटेल, शिक्षक समीर मकानदार, असगर जमादार, हसीना पटेल, फातिमा मोकाशी यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले.

थोडे नवीन जरा जुने