Top News

बस सेवा बंद; अकीवाट परिसरातील प्रवाशांची गैरसोय वाढली


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

अकीवाट गावातून खिद्रापूर मार्गे कुरुंदवाड येथे जाणारी सकाळी ९ वाजताची बस बंद झाल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांना पर्यायी सोय नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कुरुंदवाड हे तालुक्यातील प्रमुख शहर असून येथे रुग्णालये, मोठी दुकाने, शाळा, महाविद्यालये तसेच भाजीपाला मार्केट असल्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी व मजूर दररोज ये-जा करतात. विशेषतः सकाळच्या वेळेत ही बस अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, खिद्रापूरकडून येणारी सकाळची ९ वाजताची बस बंद झाल्याने नागरिकांना वेळेत गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना शिरोळ तालुक्याच्या वतीने कुरुंदवाड आगार प्रमुख सय्यद मॅडम यांना निवेदन देण्यात आले. बंद असलेली बस सेवा तात्काळ सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रतीक धनवडे, तालुकाप्रमुख निलेश तवंदकर, तालुका चिटणीस मंगेश पाटील, गणेश सुतार, सचिन मठपती, श्री उगळे, स्वप्नील चव्हाण, ओंकार बाबर, गणेश चव्हाण, प्रणव जाधव, सागर लोहार व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने