Top News

महिलांनी एकत्र येऊन बचत, कर्ज व व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे : सौ. निलांबिका हुक्केरी



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 

        अध्यात्मक क्षेत्रात नाव लौकिक असलेल्या जनवाड आणि परिसरात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शिवशक्ती महिला को-ऑप सोसायटीचे उद्घाटन झाले असून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा सहकारी संस्थांचे गरज आहे.महिलांनी एकत्र येऊन बचत, कर्ज व व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे असे मत सौ.निलांबिका हुक्केरी यांनी व्यक्त केले. जनवाड शिवशक्ती महिला को आप सोसायटीचे उद्घाटन परमपूज्य साधनानंद महाराज यांच्या दिव्य सानिध्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सुनीता ऐहोळे म्हणाल्या की स्थापन केलेल्या या शिवशक्ती को ऑप सोसायटी सहकार क्षेत्रात लवकरच आदर्श निर्माण करेल .आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी या भागाचे नंदनवन केले आहे.महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य दिले.आज त्यांच्याच आदर्श ठेवून येथील महिलांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली आहे. गावातील सर्वच महिला संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावावे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून महिलांसाठी विविध योजना हाती घेण्यात आले आहेत. याचाही लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन केले.

          शिवशक्ती सोसायटीच्या संस्थापिका सौ रेखा पाटील यांनी,महिलांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत भविष्यात लघुउद्योग, स्वयंरोजगार आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्टही असल्याचे सांगितले.

     कार्यक्रम ची सुरुवात परम पूज श्री साधनानंद व मान्यवर यांनी फित कापून संस्थेचे उद्घाटन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री धोंडीराम पाटील या उभयतांच्या हस्ते महाराजांची चरण पाद पूजा करण्यात आली. शालेय मुलींनी स्वागत गीताने कार्यक्रमाला चालना दिली.

       यावेळी ढोणेवाडीचे आत्मा मलिक मठाचे मठाधिपती परम पूज श्री साधनानंद महाराज यांनी आशीर्वाचन केले. उपस्थित मान्यवरांचा संचालक मंडळ कडून सत्कार करण्यात आला.   या कार्यक्रमास बि.डी.सी.सी. बँक संचालिका सुनीता ऐहोळे, सौ अश्विनी मगदूम, गीतांजली माने,नंदा पाटील,कल्पना रायजाधव,शैला विराट, शुभांगी तेली, शोभा हावले ,सुजाता पाटील, राजू मगदूम,संस्थेच्या उपाध्यक्षा पूजा मगदूम, संचालिका स्नेहल घाटगे ,अंजना मगदूम, स्वप्नाली पाटील, शांता घाटगे, उज्वला मुधाळे ,लता पाटील ,सुनिता शमणेवाडी, मायव्वा पुजारी, अनिता खोत, धनश्री वंजारे सिद्धेश्वर संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी यांच्यासह गावातील महिला व मान्यवर उपस्थित होत्या. स्वागत संचालिका स्नेहल घाटगे, यांनी केले तर आभार पूजा मगदूम यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने