Top News

शुक्रवारपासुन गणेशवाडीमध्ये श्री लक्ष्मी व श्री मरगुबाई देवीची यात्रा

अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

गणेशवाडी (ता.शिरोळ) येथील  श्री लक्ष्मी व श्री मरगुबाई देवीची यात्रा शुक्रवार दि.२४ ते २५ एप्रिल अखेर आयोजीत करण्यात आली आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान,जातीवंत खिलारी जनावरांचे भव्य प्रदर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 यात्रेनिमित्त शुक्रवार दि.२४ रोजी सकाळी नऊ वाजता देवीचे मानकरी शिरीष भिमराव खोत,पालखीचे मानकरी सागर धुळाप्पा खोत,सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रा.प.सदस्य,ग्रामस्थ,भाविक यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा होईल. सकाळी दहा वाजता सर्व ग्रा.प.महिला सदस्या,महिला मडंळे,महिला बचत गट,भगिनी यांच्या हस्ते देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल.

तसेच जातिवंत खिलारी जनावरांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता महाप्रसाद होईल. शनिवार दि.२५ रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे.याचे उद्घघाटन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष माने यांचे हस्ते तर जि.प.सदस्य प्रशांत शहापुरे,प.स.सदस्या सौ.राजश्री माणकापुरे यांच्या उपस्थितीत होईल.

 यात्रेनिमित्त आयोजीत सर्व कार्यक्रमासह महाप्रसादाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन यात्राकमिटीतर्फे करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने