Top News

रुई - इंगळी मार्गावर ट्रॅफिक जाम ; नृसिंहवाडी - कुरुंदवाड, इचलकरंजी - कर्नाटक मार्ग बंद असल्याचा परिणाम



इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

 राधानगरी, काळम्मावाडी,चांदोली व कोयना या धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसाने धरणातून विसर्ग सुरु आहे.तसेच अलमट्टी धरणातून अपेक्षित विसर्ग होत नसल्याने शिरोळ तालुक्यातील पूर अपेक्षेप्रमाणे ओसरत नसलेने शेतकरी,कष्टकरी,मजूर, कामगार व नोकरदारवर्गांना वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.शेतकऱ्यांचा भाजीपाला नाशवंत असलेने वेळेवर बाजारपेठेत पाठवावा लागतो.कामगार,मजूर,नोकरदार वर्ग यांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच दूरवरुन जादा अंतरासाठी प्रवासखर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

         काही ठिकाणच्या मार्गावर जीव धोक्यात घालून प्रवास सुरु आहे.त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.याचा परिणाम रुई - इंगळी या सुरु असलेल्या मार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होत आहे.कबनूर,रुई,इंगळी या गावात तसेच पुलावर वाहतुक कोंडी प्रकर्षाने जाणवत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने