अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
मुसळधार पावसाने सर्वत्र नद्या नालाना महापुराच्या स्वरूप प्राप्त झाले आहे. चिक्कोडी तालुक्यातील नसलापूर येथील गाव पुलाजवळ एका व्यक्तीने वाहणाऱ्या कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.
घटना स्तलावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, रायबाग तालुक्यातील सौंदत्ती गावातील बाबुराव संभाजी भास्कर वय वर्षे अंदाजे 40 असून ते अंकली व नसलापुर दरम्यान मध्यभागी असलेल्या गावाच्या पुलावरून वाहत्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. सदरची घटनी ही नसलापुरच्या हद्दीत घडली आहे. बाबूराव संभाजी भास्कर यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. सदर घटनेची अंकली पोलीस स्टेशनमध्ये नोंद असून अधिक तपास अंकली पोलीस स्टेशन करीत आहेत.
