अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
केवळ दीड दिवस शाळेत प्रवेश केलेल्या वैचारिक क्रांतिकारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 'साधी राहणी उच्च विचारसरणी' मनात बाळगून एकंदर 70 च्या वर कथा, नाटके, कादंबरी लिहून साहित्य क्षेत्रात एक इतिहास निर्माण केला आहे, अश्या महान व्यक्तीचा आदर्श बाळगणे ही काळाची गरज बनली आहे .असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले .ते मानकापूर येथे आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते.
आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
आण्णा भाऊ साठे यांची जयंती निपाणी तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत मध्ये साजरी व्हावी यासाठी कर्नाटक दलीत संघर्ष समिती निपाणी तालुका संचालक , मानकापुचे लक्ष्मण माने यांनी परिश्रम घेतले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार,ग्राम पंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे,अमोल बने ,नाना माळी,,प्रमोद शेवाळे,वैशाली कुंभार,धनंजय माने, लक्षमन माने,राहुल वराळे,वैभव लोखंडे येश माने, यांच्या सह समाजातील माता,भगिनी उपस्थीत होते.
