Top News

महापुरात नुकसान झालेल्या पिकांचे व पडझड झालेल्या घरांची पारदर्शकपने सर्व्ह व्हावी : आमदार शशिकला जोल्ले



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

दूधगंगा धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसा मुळे वेदगंगा, व दूधगंगा नद्यांना महापूर आला असून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.निपाणी तालुक्यातील चांदशिरद्वाड या ठिकाणी निपानीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी अधिकाऱ्यांसह पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच निपाणी मतदारसंघातील बेडकिहाळ -चांदशिरदवाड या दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीच्या पुलाला माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी भेट देऊन पाण्याच्या पातळीचे निरीक्षण केले. पूरग्रस्त भागाला भेट देऊन, शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान पाहून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर दिले. त्याचबरोबर पिकांचे नुकसान जास्त झाले असल्याने परीक्षणात भेदभाव न करता पारदर्शकपणे सर्वेक्षण करून अहवाल देण्याच्या सूचना तालुका अधिकाऱ्यांना दिले.                       

  यावेळी शिरदवाद ग्राम पंचायत अध्यक्षा सौ दिक्षिता अमर कांबळे, आण्णा पाटील,संजय पाटील,अनिल पाटील,शीतल लडगे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व अधिकारी, स्थानिक नेते उपस्थित होते.         

थोडे नवीन जरा जुने