अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
या वर्षातील पहिल्याच चंद्रग्रहणानतंर पवित्र स्नान करण्यासाठी मंगळवारी सांयकाळी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरासमोर भाविकांची गर्दी झाली होती.
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी तिचे आध्यात्मिक महत्व अंत्यत मोठे आहे. ग्रहणकाळात मंत्रजप,तीर्थस्नान,सेवा यांना विशेष महत्व असते. चंद्रग्रहणानतंर अंघोळ करणे म्हणजे ग्रहण काळात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा ,आसुरी शक्तींचा प्रभाव आणि मानसिक अस्वस्थता दुर होऊन शरीर व मनाची शुद्धी होते.यामुळे मन प्रसन्न व ताजेतवाने होते. यासाठी मंगळवारी ग्रहणाचा कालावधी संपल्यानतंर पवित्रस्नान करण्यासाठी नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरासमोर कृष्णानदीत भाविकांची प्रचंड गर्दी होती. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समितीनेही सुरक्षेच्या योग्य त्या उपाय योजना केल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा