Top News

बोरगाव शादी महल बांधकामासाठी १ कोटी तर दोड्ड जैन बस्ती जीर्णोद्धार कामासाठी ५० लाखाचा निधी मंजूर : नगरसेवक शरद जंगटे यांची माहिती

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

      पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने माजी खासदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री व निपाणीचे आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव येथील मुस्लिम समाजाच्या शादीमहल बांधकामासाठी 01 कोटी तर शहरातील जैन समाजाच्या दोडबस्ती कामासाठी 50 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक व बोरगावचे नगरसेवक शरद जंगटे यांनी आयोजित पत्रकार बैठकीत दिली.

        की पुढे म्हणाले की,बोरगाव हे सर्वाधिक जैन वस्तीचे शहर आहे.असे असतानाही शहरा मधील या दोड्ड बस्ती मंदिर जीर्णोधाराकडे अनेकांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे याची दखल घेऊन माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांनी यासाठी मायनॉरिटी फंडातून 02 कोटीचा निधी मंजूर व्हावा यासाठी प्रस्ताव पाठवला असता, पहिल्याच टप्प्यात या कामासाठी 50 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.तर उर्वरित रक्कम ही बांधकामाच्या टप्प्याटप्प्याने संबंधित मंदिर कमिटीच्या नावे येणार आहे.शिवाय मुस्लिम समाजातील शादीमहल बांधकासाठी 02 कोटीचा प्रस्ताव पाठवला असता,यासाठीही पहिल्या टप्प्यात 01 कोटीचा निधी मंजूर होऊन याचाही उर्वरित निधी कामाचा टप्पा पूर्ण होताच मिळणार असल्याचेही सांगितले. 

शहरामध्ये विविध जाती धर्माचे,लोक वास्तवास असतानाही आम.शशिकला जोल्ले यांनी प्रत्येक समाजाच्या मंदिर जिर्णोद्धारासाठी वारंवार बोरगाव शहराला निधी देऊन धार्मिकदृष्ट्या पुढारलेल्या या शहराला गत वैभव आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे बोरगाव शहराच्या जिर्णोद्धारासाठी जोल्ले दाम्पत्याचा मोठा सिंहाचा वाटा असल्याचे मत नगरसेवक शरद जंगटे प्रकट केले. आयोजित पत्रकार परिषदेत,महावीर पाटील,बाहुबली पाटील,भरत पाटील, अजित तेरदाळे,फिरोज अफराज,शब्बीर मुजावर,जहांगीर शेख,आयुब मकानदार,बी के महाजन,जितू पाटील,सचिन कोळी,शंकर गुरव, भरत कांबळे,किसनu गोसावी,अमोल पाटील,सागर आलासे,राजु लटलटे,संजू महाजन,भूपाल महाजन,राजू कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने