बोरगाव शादीमहल बांधकामासाठी १ ,कोटी तर दोड्ड बस्ती कामासाठी ५० लाखाचा निधी मंजूर
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव येथील शादी महल बांधकामासाठी व जैन दोड्ड बस्ती कामासाठी निधी मंजूर करावा यासाठी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी वेळोवेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना भेटून बेंगळूर वारी करून पाठपुरावा केला. या पाठपुरावायला यश येताना जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांच्या विशेष प्रयत्नाने बोरगाव येथील शादीमहल बांधकामासाठी 01 कोटी व दोड्ड बस्ती च्या कामासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला असताना हे काम आम्ही केले आहे, असे विरोधक सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. या कामासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी व माजी मंत्री वीरकुमार पाटील काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांचेच प्रयत्न असून विरोधकांनी श्रेय न घेता जनतेची दिशाभूल थांबवावी, असे कार्यकर्त्यांनी बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत आपले मत व्यक्त केले.
आज सिद्धेश्वर सभा भवन येथे मुस्लिम व जैन कमिटीस मंजूर पत्राचे वितरण करण्यात आले. या वेळी राजू खिचडे म्हणाले की, शादीमहल व जैन बस्ती साठी काँग्रेस नेत्याकडून प्रयत्न झाले आहेत याबाबतचे अधिकृत आदेश पत्र ही कालच सतीश जारकीहोळी हे अण्णासाहेब हावले यांच्या घरी सांत्वनासाठी आले असता दिले आहेत. त्यामुळे सदर निधी हा काँग्रेस नेत्यांच्या विशेष प्रयत्नानेच मंजूर झाला आहे असे मत खिचडे यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित असलेल्या जैन कमिटीचे प्रमुख टी.डी. सवाडे म्हणाले की ,अत्यंत जुनी बस्ती असलेल्या दोड्ड बस्तीच्या जिर्णोदरासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण अण्णासाहेब हावले यांच्याकडे मागणी केली होती .व वेळो वेळी कागदाचा पाठपुरावा केला होता. आज त्यांच्यामुळेच सदर बस्तीसाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाले असल्याचे सांगितले.
मुस्लिम कमिटीचे प्रमुख परवेज अफराज म्हणाले, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांच्या प्रयत्नामुळेच आमच्या मुस्लिम शादी महल साठी 01 कोटींचा निधी मंजूर झाला आहे .विरोधक श्रेय घेऊ नये असे ही म्हणाले.
विद्याधर अम्मन्नावर म्हणाले, बोरगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने केलेले कामांचे श्रेय विरोधक घेत आहेत .हे चुकीचे आहे . कोणते काम कोण करत आहे हे शहरातील सुज्ञ नागरिकांना माहित आहे.त्यांनी केलेल्या कामाबद्दल ते सांगावेत .काँग्रेस सरकारकडून झालेल्या कामांचा श्रेय घेणे थांबवावे असा इशारा दिला.
याप्रसंगी प्रशांत लगारे, अजित पाटील, संदीप कासार ,राजेंद्र वाळवेकर , नितीन चिपरे, बाबासाहेब पाटील, मलगोंडा म्हैसाळे, विद्याधर अम्मन्नावर, बाबासाहेब पाटील,परवेज अपराज,रियाज मोमीन, बाळू अपराज, आयुब मकानदार, बबन मुजावर, रशीद मोमीन, जमील अत्तार, मुबारक गवंडी, इमाम बुरके, सलमान जमादार, शब्बीर आवटी, राजू मकानदार, जहाँगीर अफराज, इम्रान कापसे, बाबू कापसे, बाळासाहेब बसन्नवर,अजित फिरगन्नावर, भाऊसाब बंकापूरे, डॉ. महावीर बंकापूरे, यांच्या सह जैन व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा