Top News

डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालयात ए.आय ची राष्ट्रीय परिषद संपन्न.

सायंटिस्ट डॉ. अरविंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन 



मलकापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व IQAC विभागांतर्गत दि. २४ फेब्रुवारी रोजी 'विज्ञान संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय). विषयावर एकदिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली.

या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरविंद पाटील (सायंटिस्ट, कोरिया पोलार रिसर्च इन्स्टिट्यूट) उपस्थित होते. डॉ. पी. एम. गुरुबसवराज (राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी, बेळगावी) यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून संशोधनातील आधुनिक प्रवाहांवर भाष्य केले. तसेच डॉ. स. ए. संकपाळ (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) व डॉ. श्रीकांत सदावर (सेजाँग युनिव्हर्सिटी, साऊथ कोरिया) यांनी विज्ञान संशोधन आणि मटेरियल सायन्स व 'ए.आय.'च्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. जी. पवार होते. ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. एस. बी. पोरे, डॉ. पी. एस. नाईक, प्रा. के. व्ही. करे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. अविनाश लोहार यांनी केले. या परिषदेत संशोधक व विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

थोडे नवीन जरा जुने