Top News

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे उद्या राज्यभरात दुर्ग संवर्धन अभियान : ३५० गड - किल्ल्यावर होणार स्वच्छता व देवदेवतांचा मानसन्मान

 


अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) व श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण - प्रकृती विभाग अंतर्गत रविवार ता.२२ फेब्रुवारी रोजी व्यापक दुर्ग संवर्धन अभियान राबविण्यात येत आहे.या अंतर्गत राज्यातील ३५० पेक्षा अधिक गड - किल्ल्यावर स्वच्छतेसह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

  रविवार ता. २२ फेब्रुवारी रोजी राज्यातील श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील महिला- पुरुष सेवेकरी ,भाविक आपल्या भागातील जवळच्या गड- किल्ल्यावरील स्वच्छता करुन तेथील देव- देवतांचा मान-सन्मान करणार आहेत.तसेच येथील ऐतिहासिक माहीती,पशु-पक्षी,वृक्षवेली,औषधी वनस्पती,जैववैविधता यांची माहीती संकलित करणार आहेत.

   गड- दुर्ग परिसरातील गावामध्ये ग्राम अभियान राबवुन तेथील ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. शिवनेरी,तोरणा,पुरदंर,रायगड, प्रतापगड,सिंहगड देवगिरी अशी ३५० दुर्ग - किल्ले हिंदवी स्वराज्याची शक्तीस्थळे ठरली आहेत.मात्र यांची सद्या दुरावस्था झाली आहे.याची काही प्रमाणात डागडुजी ,स्वच्छता करुन हा संस्कृतीचा ठेवा अभातीत ठेवण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्यावतीने दुर्ग अभियान राबविण्यात येत आहे. या दुर्ग अभियानातुन ,हिंदवी स्वराज्याचा,महाराष्टाचा ऐतिहासिक ,गौरवशाली इतिहास आजच्या पिढीला समजावा हा उदात्त हेतु आहे.  या दुर्ग संवर्धन अभियानात निसर्गप्रेमी,दुर्गप्रेमी,ग्रामस्थासह सेवेकर्‍यांनी उस्फृर्त सहभाग घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ गुरुपीठातर्फे करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने