Top News

राजकारण विरहित कार्य केल्यास कृषी क्षेत्रात प्रगती : युवा नेते उत्तम पाटील

 बोरगाव येथे जय गणेश PKPS चे थाटात उद्घाटन

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

       शेतकरी हा देशाचा व कृषी संघाचा आर्थिक कणा आहे,सहकार संस्थांमुळे ग्रामीण भागाचा विकास होत असतो. सहकार क्षेत्र म्हणजे विश्वासाचे प्रतीक असते. या विश्वासाच्या जोरावर आपण आपल्या संस्थेत प्रामाणिकपणे कार्य केल्यास नक्कीच संस्था प्रगतीपथावर पोहोचत असते. नफा मिळवणे हा उद्देश बाजूला ठेवून आपण राजकारण विरहित सहकारी संस्था चालविल्यास नक्कीच संस्थेचा नावलौकिक होतो असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. ते बोरगाव येथे जय गणेश विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

           प्रारंभी नांदणी मठाचे स्वस्तश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, चिंचणी मठाचे उत्तर अधिकारी परमपूज्य शिवप्रसाद देवरू व सदलगा येथील दरीखान आजा यांच्या सानिध्यात, युवा नेते उत्तम पाटील व संस्थापक अध्यक्ष अभयकुमार मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

         बोरगाव येथे मगदूम घराण्याला सामाजिक सेवेचा वारसा आहे. अभयकुमार मगदूम हे सुद्धा समाज सेवेत अग्रेसर असतात. राजकीय करीत असताना सर्व समाजाला विश्वासात घेऊन कार्य करण्या मागे मगदूम घराणे नेहमीच प्रयत्न करीत असते संघाच्या वाटचालीत आमच्या शुभेच्छा असतील अशी भावना शेवटी उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.

        प्रारंभी संस्थापक अध्यक्ष अभयकुमार मगदूम स्वागत करून प्रस्ताविकात म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून आपण सहकार क्षेत्रात कार्य करीत आहे. २० वर्षापासून आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्य केले आणि याचीच पोचपावती म्हणून आज जय गणेश कृषी संघास मंजुरी मिळाली. यापुढे युवा नेते उत्तम पाटील यांनी या संघाचा पुढाकार घेऊन आम्हाला मार्गदर्शन करावे.स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शनपर आमची वाटचाल सुरू असून संघाच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे असल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.

            यावेळी ऊस दर मिळवण्यासाठी अहोरात्र झटलेल्या शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेल्या श्रेया उत्तुरे व मान्यवरांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला.  या प्रसंगी सुनील नांगरे पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, उपनगराध्यक्ष भारती वसवाडे, गौरी गणेश महिला संघाच्या चेअरमन सौ अश्विनी मगदूम, डॉ. शंकर माळी, टी. आर. पाटील, महावीर पाटील, मनोजकुमार पाटील, अभयकुमार करोले, अशोक पाटील, राजू मगदूम, सागर मिरजे, राजेंद्र पाटील,अरुण बोने, सुजाता लगारे, प्रकाश पाटील, पोपट पाटील, बाबासाहेब वठारे, बी.जे. पाटील, धोंडीराम पाटील, संघाचे चेअरमन तेजपाल मगदूम, व्हाईस चेअरमन प्रकाश चौगुले यांच्यासह सर्व संचालक, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सर्व नगरसेवक, बँक कर्मचारी,सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे व आर एस पचंडी यांनी केले तर आभार शोभा हवले यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने