Top News

क्रॉपसॅप संलग्न ऊस पीक शेतकरी शेतीशाळा हेरले येथे संपन्न

 


संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

 महाराष्ट्र शासन कृषी विभाग सन २०२५ / २६ क्रॉपसॅप संलग्न ऊस पिक शेतकरी शेती शाळा अंतर्गत गावापातळीवरील ऊस उत्पादक शेतकरी शेतीशाळा वर्ग ३ हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.सदर शेती शाळेला प्रमुख मार्गदर्शक शुभम पाटील, किटकशास्त्र विभाग सहा प्राध्यापक कृषी महाविद्यालय कोल्हापूर, अभिजित धनवडे, DRP हातकणंगले, मांगलेकर DRP हातकणंगले, रमेश परीट मंडळ कृषी अधिकारी, हातकणंगले उपस्थित होते. शुभम पाटील यांनी मार्गदर्शन करताना ऊस पिकांवरील कीड रोग, त्यांवर केले जाणारे जैविक, रासायनिक उपाय तसेच खोडवा ऊस व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. त्यानंतर धनवडे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना विषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे , चंद्रप्रभा सोसायटी, माजी उपसरपंच बालेचांद जमादार, माजी उपसरपंच बख्तीयार जमादार, छत्रपती शिवाजी सोसायटीचे सेक्रेटरी नंदकुमार माने , चंद्रप्रभा सोसायटीचे संचालक , भाऊसो गडकरी, चंद्रप्रभा सोसायटीचे संचालक सुरेश पाटील, जयराज कृषी मित्र मंडळ अध्यक्ष सयाजीराव गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख आनंदा गवळी , रामचंद्र निंबाळकर, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन आलमाने हातकणंगले तसेच, पूजा येजरे सहाय्यक कृषी अधिकारी, हेरले, तसेच हेरले गावचे ग्रामस्थ, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने