Top News

महेश साळुंखे यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत तेरवाड (ता. शिरोळ) येथील महेश दिलीप साळुंखे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड झाली आहे. स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेल्या या यशामुळे तेरवाड व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महेश साळुंखे यांनी तेरवाड येथील आश्रम शाळेतून आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या काळातच त्यांनी स्पर्धा परीक्षांबाबत स्पष्ट ध्येय ठेवून अभ्यासाला सुरुवात केली. सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

स्पर्धा परीक्षांच्या कठीण आणि स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची ओळख निर्माण करत त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे तेरवाड गावाचा नावलौकिक वाढला असून गावातील तरुणांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत.

महेश साळुंखे यांच्या यशाबद्दल तेरवाड व परिसरातील नागरिक, मित्रपरिवार तसेच विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने