Top News

सागर धनवडे यांची आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्ता पदी नियुक्ती



अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

मराठा क्रांती मोर्चातील अमूल्य योगदानाची दखल घेत नृसिंहवाडी येथील सागर बाळासाहेब धनवडे यांची आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्ता पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.

या नियुक्तीबाबत बोलताना राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज्य भूषण मराठा रत्न डॉ. सागर काळे यांनी विश्वास व्यक्त केला की, सागर धनवडे यांच्या अनुभव, नेतृत्वगुण व संघटन कौशल्यामुळे महासंघाच्या कार्याला अधिक बळ मिळेल. त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रश्नांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडले जाईल.

यावेळी राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय सचिव चैतन्य रावल, कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल, इतिहास आघाडीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष इतिहास संशोधक रवींद्र राजे जगदाळे, उपाध्यक्ष इंद्रजित घोरपडे गजेंद्रगडकर हिंदुराव, राष्ट्रीय सचिव लेखिका सुवर्णा ताई निंबाळकर, आंतरराष्ट्रीय सचिव उज्ज्वल सिंह गायकवाड, अधिवक्ता मंचाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रितपाल सिंह, महिला आघाडीच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्वेता राज सिंह, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशंभू जांभळे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्र स्वाभिमानी कोकिळा पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच इतिहास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सरलष्कर महेंद्र नाईक निंबाळकर, महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक भानुदास वाबळे पाटील यांच्यासह संघटनेच्या २० राज्यांतील सर्व प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांनी सागर धनवडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून सागर धनवडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठा समाजाच्या हक्कांसाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

थोडे नवीन जरा जुने