अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील लाल बहाद्दूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या विज्ञान प्रदर्शनात नाविन्यपूर्ण व समाजपयोगी प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. या सोबतच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू व पोष्टर प्रदर्शनही घेण्यात आले .इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषेद्वारे ज्ञानाची चाचपणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी ३० प्रयोगांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात डाॅ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.यावेळी इयत्ता नववी ( ब ) च्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.
या कार्यक्रमावेळी श्री किसान सेवा शिक्षण संस्थेचे चेअरमन सुरेश शहापूरे, मुख्याध्यापक एस.डी.बुरुटे, पर्यविक्षक आर.डी. खामकर ,विज्ञान विभाग प्रमुख वाय.जी. कुंभार , विज्ञान विषय शिक्षक एस.एस. खोत, प्रयोगशाळा सहाय्यक एस. वाय माने,बाळासाहेब शहापूरे इंग्लिश मेडियम स्कूलच्या मुख्याधिपिका के.एस.बस्तवाडे , सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
