Top News

आलास येथे घरफोडी; साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास



कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीतील आलास (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ५ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 राजेंद्र श्रीकांत उपाध्ये (वय ५६, राहणार पुजारी, रा. मुळ आलास, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर; सध्या रा. ओमसाई कॉलनी, बिजलीनगर, पिंपरी चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० ते १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६.०० या कालावधीत त्यांच्या आलास येथील बंद घराचे कडी-कोंडा उचकटून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी तिजोरीत ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ४ लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.

तसेच सचिन विद्याधर भावरे (रा. जयसिंगपूर) यांच्या मालकीची ६० हजार रुपये किमतीची २०२० मॉडेलची काळ्या रंगाची Honda Unicorn ही दुचाकीही चोरीस गेली आहे.

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने