Top News

बोरगाव येथील आचार्य श्री 108 शांतीसागर सोसायटीचे 26 फेब्रुवारी रोजी माणकापूर शाखेचे उद्घाटन

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

             सहकार क्षेत्रात अल्पावधीतच गरुड झेप घेत सर्वसामान्य शेतकरी, सभासद, उद्योजक, लहान व्यापारी यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या बोरगाव येथील आचार्य श्री 108 शांतीसागर को -ऑप सोसायटीचे गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी माणकापूर येथे पहिल्या शाखेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन, हाल शुगर निपाणी चे संचालक, विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी माहिती दिली. 

         आज बोरगाव येथे बोलताना ते म्हणाले, सीमा भागातील बोरगाव व परिसरात औद्योगीकरण झपाट्याने वाढत आहे. उद्योजक व्यापारी लहान शेतकरी, व शेतकऱ्यांचे अडचण लक्षात घेऊन त्यांना वेळेत कर्ज पुरवठा करून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी आपण 2023 साली सर्वांच्या मागणी अनुसार या ठिकाणी श्री शांतीसागर संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागात सहकाराचे तत्वे रुजविताना सहकार क्षेत्राचे महामेरू, *जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले* यांच्या मार्गदर्शनाखाली आपण व सर्व संचालक मंडळ कार्य केले. सभासदांसाठी विविध योजना राबवून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून योग्य वेळी योग्य नियोजन करीत संस्था चालवीत आहेत. सहकारातील कार्य पाहून जवळच्या मानकापूर येथेही शाखा प्रारंभ करावी अशी मागणी होती या मागणीची दखल घेत आपण येत्या 26 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी संस्थेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन करीत आहोत. या कार्यक्रमास 

नांदणी मठाचे परमपूज्य स्वस्ति श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात बीडीसीसी बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन होणार आहे . बसव ज्योती युथ फाऊंडेशन अध्यक्ष बसव प्रसाद जोल्ले ,आशा ज्योती स्कूलचे चेअरमन ज्योतीप्रसाद जोले यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित हा उद्घाटन सोहळा होणार असून उद्घाटन दिनी विविध ठेव योजनांचे सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी शरद जंगटे यांनी केले.  मार्च अखेर जवळच्या बेडकीहाळ व मांगुर येथेही शाखा उद्घाटन करणार असल्याचे यावेळी जंगटे यांनी सांगितले.

 या पत्रकार बैठकीस व्हाईस चेअरमन राजशेखर हिरेमठ, मुख्य संचालक मंडळ,जनरल मॅनेजर वैभव कुंभार,मानकापूर व्यवस्थापक सुशांत शिरगुप्पे यांच्यासह शाखा संचालक मंडळ ,सल्लागार समिती, मुख्य संचालक व सल्लागार समिती कायदे सल्लागार उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने