Top News

शिरढोणमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर कुमार व कन्या शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

 


हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिरढोण येथील कुमार व कन्या शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आनंददायी सुरुवात करण्यात आली. यावेळी कुमार शाळेत २५ विद्यार्थ्यांनी तर कन्या शाळेत २५ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच मिळालेला हा प्रतिसाद समाधानकारक असल्याची भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मुलांच्या शिक्षणाची सुरुवात उत्साहात केली. गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी शिक्षणाचा श्रीगणेशा केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही सुरुवात शुभ ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने