Top News

श्रेयवाद, घर फाळा, पाणी समस्या, व राजकीय जुगलबंदीत झाली बोरगाव नगरपंचायतीची मासिक सभा

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

        शासनाच्या निधी वाटपावरून श्रेयवाद, वाढीव घरफाळा, पाणी समस्या, व इतर गोष्टींच्या राजकीय जुगलबंदीत आज बोरगावची मासिक सभा पार पडली. नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीची मासिक सभा विविध विषयांवर पार पडली. प्रारंभी मुख्याधिकारी एस.बी. तोडकर यांनी स्वागत करून सभे समोरील विषयाचे मांडले. नगरसेविका शोभा हावले, म्हणाल्या सध्या उन्हाळा सुरू आहे. यासाठी सर्व प्रभागांमध्ये पाण्याची समस्या जाणवू नये यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.

नगरसेवक शरद जंगटे म्हणाले, शहरातील एका खाजगी शिक्षण संस्थेकडून विनापरवाना बांधकाम झाला आहे . कोट्यावधी रुपयांचे टॅक्स बाकी आहे. असे असताना त्यांच्याकडून कर वसुली का होत नाही. गाळेधारकांना नोटीस देऊन गाळे भाडे वसूल व्हावे, प्रभाग क्रमांक दोन मधील ब्रिटिशकालीन विहिरीची स्वच्छता करून पाणी नागरिकांना द्यावे. पाच टक्के घरफाळा वाढवावे असा प्रस्ताव आहे पण यामुळे नागरिकांना त्रास होतो .घरफाळा वाढू नये नागरिकांना उतारा देण्यासाठी पाच-सहा महिने टाळाटाळ करण्यात येत आहे याकडे कुणाचे लक्ष नाही. 

आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने शहरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत त्याचे इतरांनी श्रेय घेऊ नये. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास कोणाचाच विरोध नाही. सर्वांना विश्वासात घेऊन नगरपंचायतीचे कर्मचारी कार्य करावे. सध्या उन्हाळा तीव्र आहे या उन्हाळ्यात पाणी समस्या जाणवू नये यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावे. विकास कामाला माझा विरोध नाही पण या विकास कामात आपण केलेले श्रेय इजरानी घेणे हे चुकीच आहे. श्रेय घेणारे स्वतः आत्मपरीक्षण करावे असे सांगितले. 

नगरसेवक पिंटू कांबळे म्हणाले, आपल्या वार्डात गेल्या सहा महिन्यापासून बोरवेल बसविण्यास विनंती केली आहे हे काम अजून झाले नाही असे सांगितले. नगरसेविका अश्विनी पवार म्हणाल्या, प्रभाग क्रमांक 13 मध्ये होत असलेली पाणी समस्या मिटवावी. 

नगरसेविका संगीता शिंगे म्हणाल्या, ज्यांच्याकडे जे काम सोपविण्यात आले आहे ते काम कर्मचाऱ्यांनी करावे .16 हून अधिक सफाई कामगार असताना संपूर्ण शहरात स्वच्छता होत नाही आहे यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली.

सभापती प्रदीप माळी म्हणाले, शासनाकडून नगरपंचायतीच्या विशेष अनुदान येत आहे. तरीही आपण घर पाळा व पाणी फाळातून सर्व विकासकामे राबवीत आहोत. सफाई कामगारांना शौचालय बांधून देणे, मोकाट कुत्र्यांसाठी शेड निर्मिती, सांडपाणी प्रकल्पातून खत निर्मितीसाठी विशेष प्रोजेक्ट निर्मिती सह अन्य कामे हाती घेण्यात आलेले आहेत.अमृत टू पाणी योजनेचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांना सोय करून द्यावी अशी मागणी केली.

सर्वे क्रमांक 729 मध्ये दोन एकर जागा ही शादीमहल साठी, दोन एकर जागा सरकारी पदवी पूर्व कॉलेज साठी व दोन एकर जागा खाजगी शिक्षण संस्थेसाठी असे आहे. तसेच दहा एकर जागाही न्यायालयात आहे. हे सोडून अन्य गायरान जमिनीवर अतिक्रमण झाले असून या अतिक्रमण निर्मूलनासाठी महसूल विभागाने प्रयत्न करावेत. उप पोलीस चौकी अग्निशामक ठाणे मोठा दवाखाना त्यासाठी जागा गरजेचे असल्याचे शरद जंगटे यांनी सांगितले.

नगरसेवक जावेद मकानदार म्हणाले, प्रभाग क्रमांक 5 मध्ये 7 लाख 50 हजार रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात आलेले आहे. मात्र अजूनही शौचालयाचा उपयोग नागरिकांना होत नाही.पाणी समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे तरी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन समस्या मिटवावे अशी मागणी केली.

नगराध्यक्ष दिगंबर कांबळे म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी युवा नेते उत्तम पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्यात आलेला आहे. प्रत्येक नगरसेवकांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी कार्य करीत आहेत. तरीही विरोधक टीका करून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. पाणी समस्या ,स्वच्छता ,आरोग्य यावर आपण भर देत आहोत. बहुचर्चित असलेल्या शिवाजी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा व या ठिकाणी शिवाजी उद्यान व्हावे यासाठी युवा नेते उत्तम पाटील यांचे विशेष प्रयत्न असून त्यांच्या मार्शनाखाली मराठा समाजाला नगरपंचायतीकडून एनओसी देण्यात आलेले आहे. प्रत्येक समाजाला योग्य न्याय देण्याचे काम सत्ताधारी गटाकडून होत असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमास उपनगराध्यक्ष भारती वसवाडे,आरोग्य अधिकारी विलोल जोशी, हेस्कॉम शाखा अधिकारी संताना परेर, ग्राम सहाय्यक जयपाल पाटील, प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडइनकर ,द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, महसूल निरीक्षक संदीप वाईंगडे, नगरसेविका सुवर्णा सुभाने रुकसाना अपराज वर्षा मनगुते, अश्विनी पवार ,रोहित पाटील, तुळशीदास वसवाडे, माणिक कुंभार, गिरीजा वठारे, यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने