अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील गौरवाडसह औरवाड,आलास,बुबनाळ,कवठेगुलंद,शेडशाळ, गणेशवाडी परिसरात मंगळवारी रात्री पावणेनऊ च्या दरम्यान वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर गणेशवाडी - शेडशाळ रस्त्यादरम्यान असलेल्या बंडु माणगांवे यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाला आग लागली .दरम्यान दिवसभर पावसाचे कोणतेही वातावरण नव्हते.मात्र सांयकाळी सातनतंर जोरदार वादळी वारे सुटले.यानतंर विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरु झाला.तसेच वीजपुरवठाही खंडीत झाला.रात्री पावणेनऊ दरम्यान अवकाळी पाऊस सुरु झाला.यामुळे सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले.पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. अवकाळी पावसामुळे गौरवाडसह परिसरात कापणीस आलेल्या गहु,खपली,हरभरा पिकांचे मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे.रात्री उशिरापर्यंत जोरदार वादळी वार्यासह पाऊस सुरु होता.
