Top News

बोरगाव येथे एकाची विष प्राशन करून आत्महत्या



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

         बोरगाव येथील एका इसमाने आपल्या शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवार दुपारी ४ वाजता उघडकीस आली. शितल चंद्रकांत फिरगन्नवर (वय ३८) असे मृताचे नाव आहे.

       याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शितल फिरगनावर हे बोरगाव येथील मूळ रहिवाशी असून तो शेती व अन्य काम करीत होता. परिस्थिती बेताची असल्याने मिळेल ते काम करीत आपला कुटुंब चालवीत होते. १७ मार्च रोजी सायंकाळी अचानकपणे शितल हे घरातून निघून गेले होते. घरातील मंडळींनी इकडे तिकडे शोध केला असता त्यांचा संपर्क झाला नाही. 18 रोजी दुपारी ४ वाजता वडील चंद्रकांत हे आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले असता शितल हे मृत अवस्थेत आढळून आले.

     तातडीने त्यांनी सर्वांना ही माहिती देऊन सदलगा पोलिसांनाही माहिती दिली. आपल्या शेतातच विष प्राशन करून आत्महत्या करून घेतल्याचे उघडकीस आले. मात्र आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शितल यांच्या पश्चात आई-वडील भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. वडील चंद्रकांत यांनी फिर्याद दाखल केले असून अधिक तपास सदलगा पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने