सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क :
'साक्ष शौर्य, त्याग अन् बलिदानाची... सुरुवात नव्या संकल्प प्रवासाची' अशा उदात्त भावनेने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी आपल्या नव्या सामाजिक-राजकीय प्रवासाला प्रारंभ केला.शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील ऐतिहासिक 'अमर जवान' स्मारकास नतमस्तक होऊन त्यांनी नव्या जबाबदारीची सुरुवात केली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा संकल्प दौरा पार पडला.
यावेळी रेंदाळ जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी जाधव आणि टाकळी तालुका पंचायत समितीचे सदस्य अविनाश पाटील या दोघांचा सत्कार ग्रामपंचायत टाकळी आणि माजी सैनिक संघटना आणि शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आला यावेळी आपल्या मनोगत जाधव यांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतींना उजाळा देत, त्यांच्या त्यागाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सैनिक टाकळी हे गाव 'सैनिकांचे गाव' म्हणून ओळखले जाते. येथील अमर जवान स्मारक हे केवळ एक वास्तू नसून ते शौर्य आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. या स्मारकासमोर नतमस्तक होताना शिवाजी जाधव यांनी भावना व्यक्त केल्या की, "ज्याप्रमाणे सैनिक निधड्या छातीने देशाची सेवा करतात, त्याच समर्पित भावनेने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची प्रेरणा मला येथून मिळाली आहे." शिवाजी जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून युवासेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य पदी नेमणूक करून युवा सेनेची जबाबदारी दिली या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात तरुणांचे मोठे संघटन उभे केले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधवच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन, शिवाजी जाधव आता अधिक जोमाने सक्रिय राजकारणात पाऊल टाकत आहेत. या दौऱ्यामुळे त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीत एक नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी शिरोळ तालुका संघटक संभाजी गोते, शाखाप्रमुख महेश पाटील उपशाखाप्रमुख संभाजी गायकवाड माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बी एस पाटील माजी सैनिक चंद्रकांत भोसले गोविंद पाटील हणमंत पाटील संभाजी पाटील डॉ सिद्धू पाटील राजू पाटील आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
