शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त शिरोळ शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अनेक स्वामी भक्तांनी यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले असून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
येथील पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या सोमेश्वर निवासस्थानी २० मार्च रोजी प्रगट दिनानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ९ वाजता स्वामींच्या प्रतिमेचे पूजन, सामूहिक आरती तसेच नामस्मरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील असणार आहेत. यावेळी आमदार अशोकराव माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष सौ. योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, श्रीदत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दरगू गावडे, पंचगंगेचे व्हाईस चेअरमन बाबा पाटील यांच्यासह नगरपरिषद सदस्य व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रगट दिनानिमित्त होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घ्यावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आशुतोष माळी यांनी केले आहे.
