Top News

स्वीकृत सदस्यपदासाठी राधा ऊर्फ दिपाली पाटील यांचे नाव चर्चेत

 


इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

    दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीत सक्रियपणे लढत दिलेल्या राधा ऊर्फ दिपाली पाटील यांचे नाव सध्या जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदासाठी चर्चेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. जरी त्या निवडून आल्या नसल्या तरी स्थानिक पातळीवरील त्यांचे संघटन आणि जनसंपर्क लक्षात घेता स्वीकृत पदासाठी त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.

दिपाली पाटील या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून दत्तवाड परिसरात त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. 

त्यांचे पती उदय पाटील हे परिसरात जनसंपर्क असलेले नेते म्हणून ओळखले जातात. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात, अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच निवडणुकीदरम्यान अनेक गावांमध्ये त्यांना चांगला पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले.

राजकीय वर्तुळात उदय पाटील हे सतेज पाटील यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते मानले जातात. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यपदासाठी दिपाली पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या नावाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आगामी काळात जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड करताना पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थकांकडून मात्र दिपाली पाटील यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोडे नवीन जरा जुने