Top News

जारकीहोळी बंधू व जोल्ले दाम्पत्यांच्यामुळेच बोरगावच्या शादीमहल बांधकामास 01 कोटीचा निधी मंजुर :फिरोज अफराज

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

          बोरगाव येथील शादी महल बांधकामास पालकमंत्री सतीश जारकीहोळी बंधूसह माजी खासदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले दाम्पत्यांच्या विशेष प्रयत्नामुळेच 01 कोटीचा भरीव निधी मिळाला असल्याची माहिती बोरगाव मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते व भाजप नेते फिरोज अफराज यांनी दिली.या कामास आपण स्वतः साक्षीदार असल्याचे ही ठामपणे सांगत, न-केलेल्या कामात इतरांनी नाक खुपसू नये असा इशाराही दिला.

         फिरोज अफराज म्हणाले की, श्री हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक व बोरगावचे नगरसेवक शरद जंगटे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी आपल्याकडून शादीमहल जागेच्या उताऱ्याची मागणी केली असता,मी स्वतःहून बोरगाव येथील मुस्लिम समाजाच्या शादीमहल अध्यक्षांकडून जागेचा उतारा घेऊन, त्यासोबत अन्य कागदपत्रे सुद्धा बेंगलोर दरबारी कामासाठी गेलेल्या नगरसेवक शरद जंगटे यांना पाठविली होती.त्यानंतर सदरची कागदपत्रे घेऊन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी शादीमहल बांधकामास निधी मंजुरीच्या मागणीस पत्र पाठविले असता त्यास पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अनुमोदन देत, 11 फेब्रुवारी 2026 रोजी या कामास मंजुरी देण्यास अल्पसंख्यांक मंत्री जमीर अहमद यांना शिफारस केली असता,शादीमहल बांधकामाच्या 01 कोटी निधीस नुकतीच मंजुरी मिळाली आहे.पण काही लोकांनी सदरचा निधी हा आपणच केल्याचे भासवून जनमानसात दिशाभूल करण्याचा एक वेगळाच चंग बांधला आहे. त्यामुळे सदरच्या अफवांवर कोणीही विश्वास न ठेवता मंजूर झालेला निधी हा केवळ जारकीहोळी बंधू अन् जोल्ले दाम्पत्यानीच केला असल्याचा ठाम विश्वास आपण देत असल्याचे सांगितले.

      यावेळी नगरसेवक शरद जंगटे, जितू पाटील,बी के महाजन,अजित तेरदाळे,जहांगीर शेख, शब्बीर मुजावर,इलाई कापसे,राजू नदाफ, सुलतान चोकावे,सलमान जमादार,आयुब मकानदार,,सचिन कोळी,शंकर गुरव,भरत कांबळे,किसन गोसावी,अमोल पाटील,सागर आलासे,राजु लटलटे,संजू महाजन,भूपाल महाजन,राजू कुंभार, यांच्यासह मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते व अन्य मान्यवर उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने