Top News

घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात पुन्हा बदल; 21 ऐवजी आता 25 दिवसांचे अंतर

 


शिवार न्यूज नेटवर्क :

मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

यांनी घरगुती बुकिंगचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ग्राहकांना एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी किमान 21 दिवसांचे अंतर ठेवावे लागत होते. आता हा कालावधी वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वीच सरकारने बुकिंगचे अंतर 15 दिवसांवरून 21 दिवस केले होते. मात्र साठेबाजीला आळा घालण्यासाठी आता पुन्हा हा नियम बदलून 25 दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना दोन सिलिंडर बुकिंगच्या दरम्यान किमान 24 ते 25 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, घरगुती एलपीजीच्या दरातही अलीकडे वाढ करण्यात आली आहे. च्या माहितीनुसार दिल्लीत 14.2 किलो नॉन-सब्सिडी सिलिंडरची किंमत 853 रुपयांवरून वाढून 913 रुपये झाली आहे. मुंबईमध्ये हा सिलिंडर सुमारे 912.50 रुपयांना, तर कोलकात्यात 939 रुपये आणि चेन्नईत सुमारे 928.50 रुपयांना मिळत आहे.

तसेच 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या दरातही सुमारे 114.5 रुपयांची वाढ करण्यात आली असून त्याची किंमत आता सुमारे 1,883 रुपये झाली आहे.

गॅस बुकिंगचे अंतर वाढवणे आणि दरवाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

थोडे नवीन जरा जुने