Top News

हेरवाडमध्ये मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड ग्रामपंचायत व Samata Foundation, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हेरवाड येथे मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. १४ मार्च रोजी ग्रामपंचायत हॉल येथे पार पडणार असून परिसरातील नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समर्थ फौंडेशन यांच्यावतीने व लायन्स आय हॉस्पिटल व ग्रामपंचायत हेरवाड यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत डोळे तपासणी करण्यात येणार असून आवश्यक असल्यास चष्म्याचे नंबरही काढून देण्यात येणार आहेत. तसेच तपासणीत मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मोतीबिंदू रुग्णांसाठी विशेष सुविधा देण्यात येणार असून शिबिरातून निवड झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेणे, शस्त्रक्रिया करणे, शस्त्रक्रियेनंतरची देखभाल करणे तसेच पुन्हा गावात परत आणणे अशी सर्व व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. गोळ्या-औषधांव्यतिरिक्त रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून सर्व खर्च समता फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

हेरवाड व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, तसेच गरजू, वृद्ध व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना याची माहिती द्यावी, असे आवाहन ग्रामपंचायत हेरवाडच्या वतीने करण्यात आले आहे.

“आपली दृष्टी – आपली जबाबदारी” या संदेशातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आयोजकांनी सांगितले. 

थोडे नवीन जरा जुने