Top News

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

     कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने पीडित महिलेशी ओळख वाढवून तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले. गोड बोलून विश्वास संपादन करत त्याने तिला फूस लावली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

       दरम्यान, काही काळानंतर पीडित महिलेने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करून टाळाटाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अखेर फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर पीडित महिलेने कुरुंदवाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा केला आहे, तपास पोलीस निरीक्षक संतोष माने करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने