Top News

गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळी येथे प्रवेश सुरु

 


प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे मुलींच्या शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, गर्ल्स हायस्कूल टाकळी येथे शैक्षणिक वर्ष २०२६/२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे.

५ वी ते १० वीपर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश सुरू असून, ग्रामीण भागातील मुलींना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच अनुभवी व कुशल शिक्षकवर्ग विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. सुसज्ज व संस्कारक्षम वातावरणात विद्यार्थिनींना शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.

मुलींच्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने