Top News

विद्यासागर शिक्षण संस्था बोरगाव येथे ऍडमिशन प्रारंभ : संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हावले यांची माहिती

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

सीमा भागातील शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेली श्री विद्यासागर शिक्षण संस्था संचलित इंग्लिश व कन्नड प्रायमरी ,हायस्कूल, नर्सरी एल के जी, युके जी या क्लास साठी ऍडमिशन प्रारंभ करण्यात आले असून बोरगाव सह परिसरातील गरजू पालकांनी आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी विद्यासागरच्या शिक्षण संस्थेत मुलांना प्रवेश द्यावा असे आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्य व विद्यासागर शिक्षण संस्था चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब हावले यांनी माहिती दिली.

  यावेळी मुख्याध्यापक श्री राजू खिचडे म्हणाले की कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील बोरगांव येथे माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब हावले यांनी बोरगांव सह परिसरातील सामान्य नागरिकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी विद्यासागर शिक्षण संस्था ची स्थापना केली. प्रारंभी कन्नड भाषा कॉन्व्हेन्ट सुरू केल्यानंतर आज शिक्षणातील पारदर्शकता, नेटके नियोजन, सुसज्ज व प्रभावी शिक्षक वृंद वर्ग यांच्या मुळे आज प्रतिवर्षी शाळेचे विद्यार्थी सेंटर ला उच्च श्रेणीत येत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय स्कूल बस, प्रशस्त क्रीडांगण, मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रम यासह अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या पाठीमागचे कारण म्हणजे श्री अण्णासाहेब हावले व त्यांचे संचालक मंडळ,व शिक्षक वर्ग यांचे योगदान.

    हिंदू धर्मा मधील गुडी पाडवा ला नूतन वर्षाला सुरुवात होत असल्याने या दिवशी आपल्या मुलाला विद्यासागर शिक्षण संस्था येथे ऍडमिशन करावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब हावले यांच्या वतीने करण्यात येत आहे.

  यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब हावले, अनुज हवले,प्रकाश पाटील, पंपा म्हैसाळे, विद्यू अम्मानावर,शिवप्पा माळगे, भाऊसाहेब पाटील,रावसाब तेर दाळे, विजय शिंगे, सिद्धार्थ हवले,राहुल हवले सह विद्यासागर शिक्षण संस्था संचलित सर्व घटकांचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने