अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
गोंधळ घालण्याचे काम भाजप पक्षाचा आहे. काँग्रेसचे राजकारण हे स्पष्ट आहे.बोरगाव शहरात गेल्या दोन दिवसापासून निधी मंजुरावरून गोंधळ झालेला आहे. मुस्लिम शादी महल साठी 01 कोटी व दोड्ड बस्तीसाठी 50 लाखांचा निधी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नामुळेच झाले आहे .याचे श्रेय कोणीही घेऊ नये. दोन्ही समाजासाठी निधी मंजूर करावा म्हणून जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी पाठपुरावा केला आहे.याच अनुषंगाने सदर कामासाठी निधी मंजूर झाले आहे. तरी विरोधकांनी गोंधळ न घालता श्रेय न घेता नागरिकांची दिशाभूल करू नये असे सडेतोड इशारा खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी दिले.
कोगनोळी येथे विकास कामांचा उद्घाटनाप्रसंगी खासदार प्रियंका जारकीहोळी आले असता, त्यांनी याबाबत माहिती सांगितली.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे निधी देत आहेत. बोरगाव सर्कल रुंदीकरण,शादी महल बांधकाम, दोड्ड बस्तीसाठी काँग्रेस पक्षानेच निधी मंजूर केला आहे. या कामांमध्ये भाजप पक्षाचे नेते किंवा कार्यकर्त्यांचा कोणताच संबंध नाही. असे असताना भाजपकडून हे कामे झाले असल्याचे कोणत्या आधारावर ते सांगत आहेत. निधी मंजुरीसाठी मी व जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले व काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते साक्षीदार आहोत .आज हावले यांच्या पाठपुराव्यामुळेच निधी मिळाला आहे. त्यामुळे भाजपा पक्षाने गोंधळ न घालता इर्षेचे राजकारण थांबवावे असे स्पष्टपणे सांगितले.
त्याप्रसंगी बोरगाव मुस्लिम कमिटी व दोड्ड बस्ती कमिटी कडून खासदार प्रियंका जानकीहोळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, निपाणी ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम उद्योजक रोहन साळवे,ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, किरण रजपूत,राजू खिचडे,टी.डी.सवाडे, विद्याधर अम्मन्नावर , भाऊसाहेब पाटील, शिवप्पा माळगे,परवेज अपराज,रियाज मोमीन, बाळू अपराज,रशीद मोमीन, रहमान जमादार, फारूक मुजावर,राजू मकानदार, जहाँगीर अफराज, बाळू बंकापूरे,बाळासाहेब बसन्नवर, भाऊसाब बंकापूरे, त्यांच्यासह जैन व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
