शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
जांभळी (ता. शिरोळ) येथील पार्थ बंडोपंत मोरे (वय २० रा. मोरे मळा) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या घटनेची नोंद शिरोळ पोलिसात झाली आहे. पार्थ मोरे याने राहत्या घरातील वरच्या रूम मधील स्लॅबच्या खोलीत पंख्याच्या हुकास साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री १० ते बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. याबाबतची वर्दी श्रीकांत भिमराव मोरे (वय ४७, रा. मोरेमळा ) यांनी शिरोळ पोलिसात दिले आहे.
