Top News

कवठेसार येथे घरासमोर येऊन मारहाण व तोडफोड; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 कवठेसार (ता. शिरोळ) येथे घरासमोर येऊन धमकी देत मारहाण व मोटारसायकलची तोडफोड केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, रशिद मिरासाहेब महाबरी (वय 45, रा. कवठेसार, ता. शिरोळ) यांच्या घरासमोर दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास आरोपी अकबर मिरासाहेब महाबरी (रा. कवठेसार) हे आले, त्यांनी मोठ्याने ओरडत “रशिद कोठे आहेस, बाहेर ये, तुला जिवंत सोडत नाही” असे म्हणत धमकी दिली व शिवीगाळ केली.

त्यानंतर संशयित आरोपीने हातातील फायबर काठीने फिर्यादीच्या डाव्या पायावर व कमरेवर मारहाण केली. तसेच घरातून तलवार घेऊन फिर्यादीवर हल्ला करण्यासाठी धाव घेतली व त्यांच्या मोटारसायकलीची तोडफोड करून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी गुन्ह्याची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल महापुरे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस नाईक कोळी करित आहेत.

थोडे नवीन जरा जुने