Top News

शिवार न्युजचे प्रतिनिधी हैदर‌अली मुजावर यांच्या प्रयत्नांना यश; शेतकऱ्यांकडून कौतुक

शिरढोण / शिवार न्यूज नेटवर्क :

   गावातील माळभागावर गेल्या काही महिन्यांपासून महेश कुंभार व विलास चौगुले यांच्या शेतातील विजेचा खांब पूर्णपणे झुकलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात महेश कुंभार यांनी वारंवार महावितरणकडे तक्रार करूनही संबंधितांकडून दखल घेतली जात नव्हती.

    दरम्यान, शिरढोण गावातील उगवते तरुण नेतृत्व व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले शिवार न्यूजचे प्रतिनिधी हैदरअली मुजावर यांनी पुढाकार घेत महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी झुकलेल्या विजेच्या खांबाबाबत सविस्तर माहिती देत तो तात्काळ योग्य पद्धतीने बसविण्याची विनंती केली.

   हैदरअली मुजावर यांच्या पाठपुराव्यानंतर महावितरण कंपनीने त्वरित कारवाई करत संबंधित कर्मचारी पाठवून विजेचा खांब दुरुस्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांमधील भीती दूर झाली असून मोठा संभाव्य अपघात टळला आहे. या कामगिरीबद्दल शिरढोण गावातील शेतकऱ्यांकडून हैदरअली मुजावर तसेच महावितरण कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

थोडे नवीन जरा जुने