Top News

शेडशाळ- गणेशवाडीमध्ये गॅस वितरण सुरळीत ; भारत गॅसकडुन घरपोच सिंलेडर व्यवस्था



अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

युद्धामुळे एकीकडे संपुर्ण देशासह विविध शहरे-गावात गॅसची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाल्याचे चित्र असले तरी शिरोळ तालुक्यातील शेडशाळ-गणेशवाडी गावामध्ये भारत गॅस कडुन गॅस सिलेंडर वितरण सुरळीत असल्याने ग्रामस्थामधुन समाधान व्यक्त होत आहे.

  कुरुंदवाड येथील भारत गॅसचे गणेशवाडी येथील गजानन दत्तात्रय कुंभार व महादेव राजाराम कुंभार हे सह गॅस वितरक आहेत.

  ते म्हणाले की,शेडशाळ - गणेशवाडीमध्ये भारत गॅसचे सुमारे २००० ग्राहक आहेत. जे ग्राहक बुकींग केले आहेत.त्यांची पावती आल्यानतंर या सर्वांना आमच्याकडुन दररोज घरपोच गॅस वितरण सुरळीतपणे केले जात आहे.यामुळे सणासुदीच्या काळातही येथे कोणतीही गॅस टंचाई निर्माण झाली नाही.

  मध्यतंरीच्या काळात युद्धामुळे लोकांमध्ये गैरसमज,अफवा पसरल्यामुळे ज्या ग्राहकांकडे मोकळे सिलेंडर होते,ज्यांना गॅसची विशेष आवश्यकता नव्हती अशानीही गॅस सिलेंडर भरुन ठेवल्याने थोडासा वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला होता.मात्र भारत गॅसकडुन गॅस जपुन वापरा,ज्यांच्याकडे चुली आहेत त्यांना सरपणाचा वापर करावा अशी लोकजागृती करण्यात आली.यामुळे वितरण व्यवस्थेवरील ताण कमी झाला आहे.सध्या १३ -१४ मार्चला ज्यांनी बुकींग केले आहे.त्यांचे सिलेंडर घरपोच वितरीत केले जात आहे.

 दररोज सुमारे ६०० सिलेंडर मिळत असुन बुकींगनुसार ज्यांच्या पावत्या मिळाल्या आहेत, त्यांना ६०० सिलेंडरचे सुरळीत वितरण केले जात आहे.परिणामी शेडशाळ - गणेशवाडीमध्ये गॅस वितरण सुरळीत असल्याने ग्रामस्थामधुन समाधान व्यक्त होत आहे.

थोडे नवीन जरा जुने