अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगांव येथील युवा उद्योजक श्री शितल देवगोंडा पाटील यांच्या वतीने हिंदुस्थान फिडस डिलर, श्री अरिहंत पशु खाद्य केंद्र,श्री महालक्ष्मी ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने बोरगांव सह परिसरातील शेतकरी व दुग्ध उत्पादक यांना दुग्ध व्यवसाय, पशु संगोपन व गोठा व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन व भव्य लकी ड्रा चा कार्यक्रम बोरगांव येथील श्री चंद्रकांत मल्टिपर्पस हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
उद्योजक शीतल देवगोंडा पाटील यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन निपाणी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते मा.श्री.उत्तम आण्णा पाटील व चिकोडी जिल्हा काँगेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांच्या शुभहस्ते वृक्षास पाणी घालून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले की शीतल पाटील यांचा हा आजचा कार्यक्रम म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरत असून अशा चांगल्या कार्यक्रमांमुळे बोरगांव सह परिसराच्या विकासाला नवे बळ मिळत आहे. शेतकरी सशक्तीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी देण्या साठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी जिल्हा काँगेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले म्हणाले की शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे, शेती सोबत दुग्ध व्यवसाय हा एक महत्त्वाचा घटक आहे.प्रत्येकाने शेतीला आपले समजून व्यवसाय केल्यास यश निश्चीत आहे, आज दुघ व्यवसाय ला सुगीचे दिवस आहेत,युवकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हवले यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शीतल पाटील व आयोजक यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. तुषार चव्हाण यांनी पशु पालन व दुग्ध व्यवसाय या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. राजू खिचडे सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर आभार दर्शन पाटील यांनी केले,सौ अनिता नितीन चीप्रे यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी पशु खाद्य दहा ग्राहकांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
या कार्यक्रमास निपाणी भाग युवा नेते उत्तम पाटील व माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब हावले, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, शीतल पाटील,नगर सेवक अभय मगदूम,पिंटू कांबळे,मनोज पाटील,डॉ शंकर माळी, आर बी पाटील,तात्यासाब बसणावर,रमेश मालगावे, सुरेखा घाळे यांच्या सह कृषी विभागाचे पदाधिकारी,ग्राहक, कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
