Top News

घरातील पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांचा खून; शाहूवाडी पोलिसांकडून आरोपीला अटक

 


शाहूवाडी / शिवार न्यूज नेटवर्क : 

उचत येथील एका घरातील पैशांच्या वादातून धक्कादायक खुनाची घटना गुरुवारी रात्री घडली.वृद्ध दत्ताराम संभाजी केसरकर (वय ८३, मूळ गाव गावडी,सध्या रा.उचत) यांचा मृत्यू त्यांच्या घरातच झाला.या प्रकरणी त्यांच्या मुलगा संतोष दत्तात्रय केसरकर (वय ४०) याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस सूत्रांनुसार,संतोष केसरकर हे आपल्या वडील, पत्नी व मुलांसह उचत येथे राहत होते. तो दररोज कोल्हापूर येथे नोकरीला जात असे. घरातील बॅगेत ठेवलेले पैसे हरवल्याच्या संशयामुळे संतोषने पत्नी व कुटुंबीयांशी वाद घातला होता. पोलीसांच्या माहितीनुसार, संतोषने धमकी दिली होती की, “मी बाहेरून परत येईपर्यंत पैसे सापडले नाहीत, तर तुम्हाला सोडणार नाही.गुरुवारी सायंकाळी पत्नी व मुले शाळेचे गॅदरिंग पाहण्यासाठी मलकापूर येथे गेले होते.त्या संधीचा फायदा घेत संतोषने वडिलांच्या डोक्यावर वर्मीने हल्ला करून त्यांचा जागीच मृत्यू केला.घटनेनंतर संतोषने पुरावे नष्ट करण्यासाठी फरशीवर सांडलेले रक्त ओढणीने पुसण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांसमोर येऊन नागरिकांनी संशयित संतोषला ताब्यात घेतला आणि त्याला अटक केली.या घटनेची फिर्याद सौ. साधना संतोष केसरकर यांनी पोलिसांमध्ये नोंदवली.शाहूवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून,तपास सुरू आहे.परिसरात या खुनाची घटना समजताच मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिसून आली आहे.

थोडे नवीन जरा जुने