इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असून निवडणूक कार्यक्रम सुद्धा जाहीर झाला आहे शुक्रवार दिनांक १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून अनेक इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत.
आज दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना (उबाठा), राष्ट्रीय काँग्रेस या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ. दिपाली उदय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचे शिरोळ तालुक्यामध्ये उमेदवार निश्चित करण्यात आले असून यामध्ये दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघ हा काँग्रेस पक्षाला देण्यात आला असून या ठिकाणी काँग्रेस पक्षामधून सौ. दिपाली उदय पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील, श्री. बंडा माने पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील (बाळगोणावर), उदय पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे, एन. एस. पाटील, शंकर कांबळे, मलगोंडा पाटील सुळकुडे , अमित माने, बसगोंडा पाटील, प्रथमेश पाटील त्याचबरोबर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
