अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
गणेशवाडी ( ता.शिरोळ ) येथील पुरातन शिव गणपती देवस्थान मंदिरमध्ये माघी गणेश जयंतीनिमित्त गुरुवार दि.२२ रोजी श्री जन्मोत्सव सोहळा , विविध धार्मिक कार्यक्रमांसह तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये पहाटे साडेपाच वाजता नित्यपुजा,सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत अभिषेक, सकाळी ९ वाजता संकल्प- एकादष्णी व श्रीं ची अलंकार महापुजा होणार आहे.
सकाळी ११ वाजता किर्लौस्करवाडीच्या ह.भ.प.श्रीमती भक्ती देशपांडे यांचे जन्मकाळाचे सुश्राव्य किर्तन,दुपारी साडेबारा वाजता श्रीं चा जन्मकाळ सोहळा यानतंर तीर्थप्रसाद होईल.सांयकाळी पाच वाजता संभाजी घोरपडे व सहकारीमंडळाचे भजन,सांयकाळी सव्वासात वाजता राष्टीय स्वंयसेवक संघाचे कोल्हापुर विभाग सहसंघचालक भगतरामजी छाबडा यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. सर्व धार्मिक कार्यक्रमाचा श्री भाविक भक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
