Top News

कुटवाड येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

कुटवाड (ता. शिरोळ) येथे वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. शिवाजी दत्तू पाटील (वय 80) असे मयत वृद्धाचे नाव असून त्यांनी राहत्या घराच्या समोरील पोर्चमध्ये असलेल्या लोखंडी हुक्काला सुताच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री अडीच वाजण्याच्या पूर्वी घडली आहे. याबाबतची वर्दी विजय रामचंद्र पाटील (वय ४२) यांनी दिली असून या घटनेची नोंद शिरोळ पोलिसात झाली आहे.

थोडे नवीन जरा जुने