Top News

अकिवाट येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा



अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :

     मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटो पूजनाने झाली. सुरुवातीस सर्व मुलांचे मनोरंजन व्हावे याकरिता जेम्स बिरणगे यांनी आपल्या घोडागाडीतून मुलांना सफारी घडवून आणली. मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता वस्तू बनवून आणल्या होत्या त्यामध्ये पाना फुलांच्या रांगोळ्या टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेल्या वस्तू काड्या पासून बनवलेल्या आकृत्या याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. यामधील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक केलेले प्रयोग मानण्यात आले होते. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही पौष्टिक पदार्थ बनवून आणून त्याचेही पाककलामध्ये प्रदर्शन भरवले होते. दुपारच्या सत्रामध्ये श्री सय्यद मुजावर यांनी विद्यार्थी व पालकांचा स मोर आपल्या जादुई प्रयोग केले. सर्व महिला करता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . उपस्थित असलेल्या महिलांना शाळेमार्फत भेटवस्तू देण्यात आल्या व सेफ या संस्थेमार्फत कागदपत्रासाठी फोल्डर वाटप करण्यात आले. महिलांसाठी संगीत खुर्चीचा ही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हेल्पिंग हॅन्ड रेस्क्यू फोर्स चे अध्यक्ष निलेश तवंदकर यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन च्या साहित्यांची माहिती सांगण्यात आली. त्याचा वापर ही कसा करायचा दाखवण्यात आला. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री कुमार तवंदकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावे चिदानंद तवंदकर, पालक वर्ग माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री महेश गायकवाड सर,सौ माधुरी बागडे मॅडम, अंगणवाडी सेविका यांनी मेहनत घेतली.हा बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. याचे समाधान पालक वर्गातून होत आहे.

थोडे नवीन जरा जुने