Top News

गौरवाडच्या स्वच्छतेसाठी राबले १२० शिबीरार्थीचे हात

सहकारभुषण एस.के.पाटील काॅलेजचा राष्टीय सेवा योजनेचा उपक्रम



अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

सहकारभुषण एस.के.पाटील महाविद्यालयाच्यावतीने गौरवाड ता.शिरोळ येथे नुकताच राष्टीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न झाले.यामध्ये महाविद्यालयाचे सहा प्राध्यापक व १२० विद्यार्थी सहभागी झाले होते.

सदर शिबीर सात दिवसाच्या कालावधीत दोन सत्रात पार पडले.  सकाळच्या सत्रात ७० मुली व ५० मुलासह १२० शिबीरार्थीनी श्रमदानातुन गौरवाडमधील नदी पाणवठा,घाट,उर्दु-मराठी शाळा,ग्रामपंचायत,गावातील प्रमुख मार्गावरील रस्ते,गटारीची स्वच्छता करुन सफाई केली.तसेच श्रमदानासह मतदान जनजागृती,ग्रामसफाई,आरोग्य शिक्षण,अंधश्रद्धा निर्मुलन ,स्त्री- पुरुष सर्व्हे आदी उपक्रम राबवुन भरीव सामाजिक कार्य केले.

 दुपारच्या सत्रात विविध मान्यवरांची व्याख्याने झाली.यामध्ये अँड.अब्दुल मूल्ला यांचे महिलासाठी कायद्याचे सरंक्षण,लेखक चारुदत्त माळी यांचे जिंकण्यासाठी जन्म आपला,अमन पटेल यांचे आजचा युवक आणि मतदान जनजागृती,घोसरवाड हायस्कुलचे शिक्षक संजय पाटील यांचे संमोहन: सहप्रयोग व्याख्यान,एस.के.पाटील काॅलेज,कुरुंदवाडचे डाॅ.डी.व्ही.सुर्यवंशी यांचे शिवकालीन ग्रामीण विकास व आजची ग्रामीण परिस्थिती या विषयावर व्याख्याने झाली.

दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातुन समाजजागृतीचा कार्यक्रम सादर केला.

  शिबाराचा समारोप बुबनाळचे प्रशांत शहापुरे या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते व सहकारभूषण एस.के.पाटील काॅलेजचे प्र.प्राचार्य डाॅ.सौ.श्रद्धा कोठावळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.यावेळी विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती.

 समारोपप्रंसगी ऐश्वर्या रजपुत,ऐश्वर्या गवळी,विघ्नेष मोहीते या शिबीरार्थीनी मनोगत व्यक्त केले.अथर्व पाटील व कु.सानिका कुंभार या शिबीरार्थींना उत्कृष्ठ स्वंयसेवक म्हणुन गौरविण्यात आले.

 संपुर्ण श्रमसंस्कार शिबीर यशस्वी होण्यासाठी एस.के.पाटील काॅलेजचे कार्यक्रम अधिकारी डाॅ.व्ही.एस.मून,डाॅ.सौ.वृषाली मिणचेकर , प्रशासकीय अधिकारी डाॅ.एस.डी.चव्हाण,प्र.प्राचार्य डाॅ.सौ.श्रद्धा कोठावळे,डाॅ.दिपक सुर्यंवशी,डाॅ.आबासाहेब जाधव यांच्यासह गौरवाड ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रा.प.सदस्य, विजय नंदगावे,गणेश कांबळे,त्रृषी हुलवान,प्रशांत सुर्यवशी,जावेद पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.तर गौरवाड ग्रामपंचायत,मुनीर शेख,प्रशांत शहापुरे,प्रशांत कुंभोजे यांच्यासह मान्यवर मंडळीनी विशेष सहकार्य केले.

   श्रमदान सप्ताह कालावधीत गौरवाडमधील विविध मान्यवरासह ग्रामस्थाचे सहकार्य मिळाल्याबद्दल राष्टीय सेवा योजेनेचे कार्यक्रम अधिकारी डाॅ.व्ही.एस.मुन यांनी सर्वांचे आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने