Top News

ए.बी.हायस्कुल आलासमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

कलाश्री डॉ. बा.ग. पवार आलास-बुबनाळ विद्यालय, आलास येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. श्री. सहदेव केंगाळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले.

तुम मुझे खून दो , मैं तुम्हे आझादी दूंगा आणि अक्षरशः अनेकानी अंगठा कापून त्या रक्ताने सुभाष बाबूंना टिळा लावला, आपली क्रांती नक्कीच यशस्वी ठरणार आहे. तुमचे बलिदान कधीही वाया जाणार नाही, आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार हे नक्की असे सुभाष बाबूंचे विचार कार्यक्रमांमध्ये मांडले. प्रथमता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एस. एस.कोळेकर यांनी आपल्या शुभहस्ते केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील जिमखाना विभाग प्रमुख ए. बी. येवारे, आर.बी.मखमल्ला, एस. एस. पाटील, व्ही. एन. पाटील, पी एस. चाटे ,एस.एस. गावडे, के.जी.जोशी, दत्ता धुमाळे, गोपाळ मोरे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर ,विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने